
मालवण : मालवण शहर परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मालवण शहर धुरीवाडा येथे मुख्य रस्त्यावर भलेमोठे आंब्याचे झाड कोसळले. वीज खांब व वीज वाहिन्या ही तुटून गेल्या आहेत. त्यामुळे मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. मालवण नगरपरिषद कर्मचारी, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान झाड कोसळले त्यावेळी त्या मार्गांवरून जाणारा एक दुचाकी चालक जखमी झाला आहे. त्याना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते.
धुरीवाडा काजू कारखाना पुढे काही अंतरावर हे झाड कोसळले आहे. त्यामुळे कोळंब सागरी महामार्ग तिठा येथे बॅरीकेट घालून रस्ता बंद करण्यात आला आहे.