राणे महाराजांच्या मठात भरगच्च धार्मिक कार्यक्रम..!

Edited by: विनायक गावस
Published on: October 13, 2023 17:08 PM
views 223  views

सिंधुदुर्ग : परमपूज्य सद्गुरु श्री राणे महाराज यांच्या 95 वा जयंती उत्सव व मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळानिमित्त वराड सरव्य येथील राणे महाराज यांच्या मठात 13, 14, 15 ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये भरगच्च विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार १३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वा. मूर्ती अभिषेक, १० वा. हरिपाठ व रामनाम जप, दु. १२ वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद, सायं ७ वा शिवरामेश्वर प्रासादिक भजन मंडळ आचरा यांचे सुश्राव्य भजन, ८. वा सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ कुडाळ यांचे सुश्राव्य भजन, ९ वा. विठ्ठल रखुमाई भजन मंडळ आचरा देऊळवाडा यांचे दिंडी भजन, शनिवार १४ ऑक्टोंबर रोजी स ९ हरिपाठ, १० वा रामनाम जप, दू. १२ वा. महाआरती, १ वा. महाप्रसाद, सायं ४ ते ९ स्थानिक सुश्राव्य भजने, रविवार १५ ऑक्टोबर रोजी प. पू. राणे महाराज यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त स ९ वा. मूर्ती अभिषेक व पादुकापुजन, १० वा प. पू. नामदेव महाराज भक्त मंडळी यांचे भजन, दु. १२ वा. महाआरती, १ वा. अखंड महाप्रसाद, सायं. ४ वा. प. पू. राणे महाराज पालखी सोहळा, ७ वा. आरोलकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ आरवली सिंधुदुर्ग यांचा श्रीयाळ चांगुणा हा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. ह्या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन प. पु. राणे महाराज सेवा ट्रस्ट यांनी केले आहे.