थोडक्यात अनर्थ टळला ; कणकवलीतील दुय्यम निबंधक कार्यालयातील लाईटच्या बोर्डला आग

Edited by: उमेश बुचडे
Published on: May 17, 2023 19:40 PM
views 165  views

कणकवली : कणकवली तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर दुय्यम निबंधक कार्यालय आहे.या कार्यालयातील आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विद्युत बोर्डला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ती आग ताबडतोब पाणी मारुन आटोक्यात आणण्यात आली.

मात्र, त्यामुळे दस्त नोंदणीचे काम काही ठप्प होणार आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम त्वरित केलं जाणार आहे.त्यामुळे दुय्यम निबंध कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. आग ताबडतोब आटोक्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.