वेंगुर्ल्यात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचे शिवसेनेत इनकमिंग

सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य
Edited by: दिपेश परब
Published on: October 30, 2023 18:56 PM
views 783  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांचे कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे . जिल्ह्यामधील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी ते शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेत असून पुढील कालावधीत त्यांनी मोठी प्रगती करावी ,असे प्रतिपादन माजी खा. कर्नल सुधीर सावंत यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले .यावेळी    तालुक्यातील मोठया संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला.

शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांचा वाढदिवस आज सोमवारी  वेंगुर्ले स्वामिनी मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला .यावेळी आयोजित कार्यक्रमात  सुधीर सावंत बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख अशोक दळवी ,जिल्हाप्रमुख संजय आंग्रे ,वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर , शहरप्रमुख उमेश येरम , दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस ,सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे , उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर ,जिल्हा संघटक सुनील डुबळे , माजी जि. प. सदस्य नितीन शिरोडकर ,  माजी सभापती सुनील मोरजकर , उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई , तालुका संघटक बाळा दळवी , मितेश परब , युवक शहरप्रमुख संतोष परब , भोगवे माजी सरपंच महेश सामंत , दोडामार्ग महिला तालुकाप्रमुख ,उपजिल्हा संघटक मनीषा गवस ,गजानन नाटेकर , ऍड. श्रद्धा बाविस्कर ,मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर , विधानसभाप्रमुख बबन शिंदे ,  नंदू शिरोडकर ,राजन पोकळे , आबा केसरकर ,शबाना शेख , कोचरा सरपंच  योगेश तेली , मनाली परब , रसिका राऊळ  आदींसह तालुक्यातील , जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेना पदाधिकारी ,विविध संघटना , मित्रपरिवार , मान्यवर यांच्या वतीने सचिन वालावलकर यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला .यावेळी तालुका शिवसेनेच्या वतीने सचिन वालावलकर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.  यावेळी वेंगुर्ले शहरातील वडखोल ,शिरोडा केरवाडी ,खानोली ,पाल , पालकरवाडी वेतोरे , होडावडा , वजराट ,आसोली ,उभादांडा आधी भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.  यावेळी दिपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्प , शिरोडा केरवाडी व दोडामार्ग साठी प्राप्त झालेल्या  रुग्णवाहिका लोकार्पण  करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाट्न शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या कार्यक्रमस्थळी आनंदनाथ स्वामींचे शिल्प साकारण्याऱ्या चिपकर याचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नितीन मांजरेकर यांनी केले.