जर्मनीत नोकरी ही तर चालून आलेली सुवर्णसंधी : अच्युत सावंत - भोसले

बीकेसीत 'स्किल डेव्हलपमेंट - एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज इन जर्मनी' अंतर्गत मार्गदर्शन शिबीर
Edited by:
Published on: April 05, 2024 13:59 PM
views 212  views

सावंतवाडी : जर्मनीत नामवंत कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प कार्यरत असून भविष्यात त्यांना मोठ्या प्रमाणावर तंत्र कुशल मनुष्यबळाची गरज आहे. आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पुढकराने जर्मनी सारख्या देशात काम करण्याची सुवर्णसंधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. यासाठी बीकेसी अत्यंत महत्वाची भूमिका बजावेल, आपण फक्त या संधीच सोन करा, असं मत भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांनी व्यक्त केले.

'स्किल डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज इन जर्मनी' या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाचा जर्मनीतील बॅडन-वॉटेनबर्ग या राज्याशी सामंजस्य करार झालाय.  त्याच अनुषंगाने शुक्रवारी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मार्फत 'जर्मनीतील नोकरीच्या संधी' या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ते म्हणाले, आजचा उपक्रम हा सरकारनं पुढाकार घेऊन होत आहे. जर्मनी सारख्या देशात काम करण्याची संधी मिळण ही सुवर्णसंधी आहे. कौशल्यपूर्ण काम करणारी मुलं तयार करणं हे आमचं काम आहे. ती मुलं तयार झाल्यानंतर त्यांना चांगली संधी निर्माण करून देणं पण तेवढंच आवश्यक आहे. आजच्या या उपक्रमात भारत व महाराष्ट्रासह जर्मन सरकार देखील पुढाकार घेत आहे ही महत्त्वाची बाब आहे. नव्या पिढीसाठी ही मोठी संधी आहे‌. भोसले नॉलेज सिटी हे महाराष्ट्रातील पहिले एक्सलन्स सेंटर म्हणून जाहीर केलं यासाठी सरकारला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. त्यामुळे या संधीचा योग्य लाभ घेऊन युवक युवतींनी नोकरीच्या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन अच्युत सावंत-भोसले यांनी केल.


भोसले नॉलेज सिटी येथे हे सत्र तृतीय वर्ष मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व मेकॅट्रॉनिक्स डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते‌. यावेळी मूळचे महाराष्ट्रीयन व गेली सोळा वर्षे जर्मनीमध्ये राहणारे मॅट्रिक्स स्ट्रक्चर्सचे व्यवस्थापकीय संचालक ओंकार कलवडे यांनी विद्यार्थ्यांना या शासनाच्या उपक्रमा बद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं. यासोबतच जर्मनीतून काही कंपन्यांचे प्रतिनिधी केदार जाधव,  बॅस्टियन मुलीयर, अजय पटवर्धन यांनीही व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत कौशल्य संपन्न विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत असणाऱ्या नोकरीच्या संधी व सुविधांबाबत मार्गदर्शन केलं. याप्रसंगी भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, मॅट्रिक्स स्ट्रक्चर्सचे व्यवस्थापकीय संचालक ओंकार कलवडे, प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, पीआरओ नितीन सांडये आदी उपस्थित होते.