रोहा शहरात ज्वेलर्सचे दुकान फोडले ; दुसरा प्रयत्न फसला !

सोन्याचे दागिने, चांदीची वीट, रोख रक्कम असा 6,43,400 रुपयांचा मुद्देमाल लंपास
Edited by: शशिकांत मोरे
Published on: December 03, 2022 17:37 PM
views 271  views

रोहा : रोहा शहरातील अष्टमी नाक्यावरील सुरेखा ज्वेलर्स हे दुकान अज्ञात चोरट्याने फोडले असून या दुकानातून सोना चांदीच्या दागिन्यासह अज्ञात चोरट्याने रोख रक्कम पळवले आहे तर दुसरीकडे व रोहा शहरातील भैरव ज्वेलर्स हे दुकान अज्ञात चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना एक डिसेंबर रात्री साडेआठ ते दोन डिसेंबर सकाळी नऊच्या दरम्यान घडल्याची नोंद रोहा पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे. एकच रात्री दोन दुकानं फोडल्याने रोहयात खळबळ उडाली आहे. अष्टमी येथील सुरेखा ज्वेलर्स या दुकानातून अज्ञात चोरट्याने ६,४३,४०० रुपयाचे एकूण मुद्देमाल सोन्याच्या दागिने,चांदीची विट व रोख रक्कम पळवले आहे. या घरपोडी प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात रोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संबंधित अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर करीत आहेत.


अष्टमी नाकावरील सुरेखा ज्वेलर्स अज्ञात चोरट्याने एक डिसेंबर रात्री साडेआठ ते दोन डिसेंबर सकाळी नऊच्या दरम्यान कोणत्यातरी लोखंडी हत्याराने दुकानाचे शटर उपकुन आत प्रवेश करुन या दुकानातून अज्ञात चोरट्याने ४८००० रुपये किमतीचे दहा ग्राम वजनाचे एक सोन्याचे मंगळसूत्र, ९६००० रुपये किमतीचे वीस ग्राम सोन्याचे एक चैन, १९२००० रुपये किमतीचे चाळीसगाव वजनाचे सोन्याचे आठ चैन,२७३६०० किमतीचे ५७ ग्रॅम वजनाचे तीन सोन्याचे मंगळसूत्र,३०००० रुपये किमतीचे पाचशे पन्नास ग्राम वजनाची एक चांदीची वीट व ३८००० रोख रक्कम असे एकूण ६४३४०० रुपये किमतीचे सोन्यासह चांदी व रोख रक्कम चोरट्याने लंपास केली आहे. तर याच मध्यरात्री रोहा शहरातील  भैरव ज्वेलर्स अज्ञात चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला आहे.