
वैभववाडी : पुल पाडत असताना पुलावरून जेसीबी थेट नदीपात्रात कोसळला. ही घटना एडगाव येथे घडली असून यात चालक सुदैवाने बचावला आहे.
तळेरे - गगनबावडा मार्गाच्या काॅक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावरील एडगाव सुख नदीवरील पुल पाडण्याचे आज काम सुरू होते. सायंंकाळी ४.वाजण्याच्या दरम्यान काम सुरू असताना पुलाच्या काही भागासह वर असलेला जेसीबी थेट नदीपात्रात कोसळला. सुमारे ५०फूट उंची असलेल्या या पुलावरून जेसीबी कोसळल्याने मोठा आवाज झाला. सुदैवाने या अपघातातून जेसीबी चालक बचावला आहे. त्याला किरकोळ दुखापत झाली असून त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.