
दोडामार्ग : दोडामार्ग तालुका शिवसेनेच्या महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर यांचे विशेष योगदानामुळे तालुक्यात महिला आघाडी शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रमांसह महिला दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर तालुकाप्रमुख गवस यांसह युवा सेना तालुकाप्रमुख भगवान गवस, सुमित गवस, राकेश धर्णे, सासोली ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना कार्यालयीन प्रमुख गुरुदास सावंत, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, प्रमुख मार्गदर्शक सौ. गीतांजली सातार्डेकर, कोलझर सरपंच सुजल गवस, मणेरी विभाग प्रमुख गुणवंती गावडे, कोनाळ उप विभाग प्रमुख प्रतीक्षा सावंत, दिव्या दळवी, माटणे उपविभाग प्रमुख स्नेहल गवस, उपशहर प्रमुख रवीना सावंत, कोनाळ शाखाप्रमुख रेखा लोंढे, पल्लवी सावंत आदी उपस्थित होते.
विशेष म्हणजे याच कार्यक्रमांमध्ये महिला जागृती मेळावा घेण्यात आला. या महिला जागृती मेळाव्याला तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी उपस्थिती दर्शवत विशेष मार्गदर्शन केले. चेतना गडेकर यांनी महिलांच्या समस्या तसेच महिलांवरील अत्याचार याविषयी विशेष मार्गदर्शन करताना याचे उच्चाटन कसं करण्यात येईल याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महिलांच्या विविध कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. लहान मुलांनी सुद्धा यावेळी आपली कला सादर केली, तर महिलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी महिलांवरील विशेष प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. या स्पर्धेचे सूत्रसंचालन संध्या शिरसाट यांनी केले, त्यांनी आपल्या खास शैलीत महिलांना प्रश्न विचारून महिलांच्या कार्यक्रमात रंगत आणली, यातील विजेत्या स्पर्धकांना गणेशप्रसाद गवस तसेच व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. लोककला अभ्यासक शिक्षिका तसेच सौ. गीतांजली सातार्डेकर यांनी या मेळाव्यात महिलांना विशेष मार्गदर्शन केलं. महिला आज प्रत्येक क्षेत्रात वावरताना दिसत असली तरी सबलीकरण्याच्या माध्यमातून महिलांनी अधिक खंबीर व्हायला हवे. येणाऱ्या कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हायला हवे. आपल्यावरील अन्याय अत्याचार सहन न करता त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी महिलांनी सक्षम झालं पाहिजे, असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.