
देवगड : वृध्दाश्रम हे मंदिर आहे, या भावनेनेच या वृद्धाश्रम मंदिराला प्रत्येकाने मदत केली पाहिजे. याच उध्दार भावणेतून वाडा हायस्कुल मधील माजी विदयार्थीनी तसेच ग्रामसेविका नंदा देवरुखकर यांनी दिवाळीचे औचित्य साधून वृध्दाश्रमातील प्रत्येक वृध्द व्यक्तींना नवीन वस्त्रे व औक्षण करुन एक दिवसाचे जेवण देवून त्यांच्या सोबत जेवणाचा मनमुराद आस्वाद घेवून सामाजिक बांधिलकिच्या दृष्टीकोनातून त्यांनी लांजा येथील कोंडये गावातील अरुणा वृध्दाश्रमाला मदत केली आहे.
प्रत्येक व्यक्ती हि कुठल्याना कुठलया श्रध्देने समाजात वावरत असते. मात्र आपण समाजाचे देणे आहोत याच भावनेने समाजातील गोर गरीब जनतेला मदत करणे हे महत्वाचे असते याच बाबी ग्रामसेविका नंदा देवरुखकर यांनी हेरुन लांजा येथील वृध्दाश्रमातील सर्व वृध्द व्यक्तींना नवीन वस्त्रे घेवून दिवाळीच्या दिवशी ते परिधान करुन त्यांना एक दिवसाचे मोफत् जेवण त्याच ठिकाणी बनवुन त्यांच्या सोबत जेवणाचा आस्वाद घेणा-या ग्रामसेविका देवरुखकर यांनी एक आदर्शवत समाजासमोर पायंडा निर्माण केला आहे.
राजकीय व्यक्ती प्रसिध्दी मिळविण्यासाठी व आपल्या बाजून मतप्रवाह मिळण्याच्या दृष्टीकोनातून समाजामध्ये ब-याचदा मदत करीत असल्याचे दिसून येते मात्र सर्व सामान्य माणसे व नोकरीशाही व्यक्ती प्रसिध्दी न करता मदत करण्याच्या उदधार भावनेने व आत्मियतेने मदत करीत असतात. अश्याच उध्दार भावणेतून ग्रामसेविका देवरुखकर यांनी वृध्दाश्रमाला मदत केली आहे. देवगड तालुक्यामधील अ.कृ.केळकर हायस्कुल मधील देवरुखकर या माजी विदयार्थीनी असून त्यांनी शालेय शिक्षण नाडण येथील आपल्या मामाकडे राहून पुर्ण केले. आई वडिलांची परिस्थीती नसल्यामुळे त्या देवगड तालुक्यातील नाडण गावी लहान पणापासूनच मामाकडे राहून त्यांनी 10 पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. पुढील शिक्षणही मामाच्याच मदतीने पुर्ण झाल्यानंतर त्या रत्नागिरी जिल्हयामध्ये ग्रामसेविका म्हणून रुजु झाल्या. गरीब परिस्थितीमधून आपले शिक्षण मामाने पुर्ण केल्यामुळे याच परिस्थितीची जाणीव करुन त्यांनी या वृध्दाश्रमाला मदतीचा हाथ पुढे केला आहे.