
सावंतवाडी : लोकसभेच्या निवडणुकीत काय झालं याची मला कल्पना नाही. मात्र, या निवडणुकीत तो विषय नाही असं मत महायुतीचे कोकण पदवीधर उमेदवार तथा विद्यमान आमदार अँड. निरंजन डावखरे यांनी व्यक्त केले. निवडणूकांत पाकीटांचा पाऊस पडत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला असता त्यावर त्यांनी हे उत्तर दिले. तर महायुतीचा उमेदवार म्हणून सर्व घटक पक्ष माझ्यासोबत आहेत. ताकदीची साथ कार्यकर्त्यांची माझ्यासोबत आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार निश्चित विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवसैनिकांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, महायुतीचा उमेदवार म्हणून सर्व घटक पक्ष माझ्यासोबत आहेत. ताकदीची साथ कार्यकर्त्यांची माझ्यासोबत असल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे. सिंधुदुर्गात बरेचदा येण झालं आहे. येत नाही असं नाही. मतदारांशी थेट संवाद माझा आहे. त्यांना अभिप्रेत काम मी करत आहे. डिजिटल लायब्ररीसह कोकणातील शाळा ग्रीन स्कुल करण्याचा प्रयत्न माझा मानस आहे. अस मत अँड. डावखरे यांनी व्यक्त केले.
दरम्यान, मनसेचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत आहेत. पदवीधरची टर्म सहा वर्षांची असते. त्यामुळे दहा वर्ष दिसले नाहीत असं म्हणणाऱ्यांना काय अभ्यास आहे ? ते यातून लक्षात येते अशा शब्दांत महाविकास आघाडीच्या टीकेला त्यांनी उत्तर दिल. तर आंबा, काजू, फणस फळप्रक्रिया करणाऱ्या युवा उद्योजकांना केंद्रातून पाठबळ देण्याचा माझा प्रयत्न आहे. मधनिर्मिती सारख्या प्रकल्पाला स्थानिकांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाणार आहे. हा मतदारसंघ पाच जिल्ह्यांचा आहे. उमेदवार प्रत्यक्ष सगळीकडे पोहचू शकत नाही. ही निवडणूक संघटनेची आहे. संघटनेच्या जीवावरच ही निवडणूक लढता येते. महायुतीच्या संघटनात्मक ताकदीवरच ही निवडणूक आम्ही जिंकू असा विश्वास असल्याच ते म्हणाले. माझा थेट मतदारांशी संवाद आहे. स्थानिकांना याच ठिकाणी रोजगार देण्यासाठी आमचा भर आहे. कोणाला आपल घर सोडून बाहेर जावं असं वाटतं नाही. आत्ताच सरकार संवेदनशील आहे. शिंदे, फडणवीस व अजित पवार हे आमच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देतील. कोकणात रोजगार उपलब्ध होईल असं मत व्यक्त केले. तर पदवीधर निवडणूकांत पाकिटांचा पाऊस पडत असल्याची चर्चा आहे असा सवाल केला असता ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकांत काय झालं याची मला कल्पना नाही. या निवडणुकीत तो विषय नाही.
सावंतवाडी येथे दौऱ्यावर असताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयास त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी शिवसैनिकांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादीचे काका कुडाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, नारायण राणे, रूपेश पावसकर, प्रेमानंद देसाई, उमेश गावकर, सुजित कोरगावकर, आबा केसरकर, श्री. घाग आदी उपस्थित होते.