'स्वरसंध्या' मधून बहारदार गीतांचा नजराणा..!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 17, 2023 18:21 PM
views 103  views

कुडाळ : कुडाळ येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिरामध्ये (दीपोत्सवाच्या निमित्ताने) बॅ नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने व श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ यांच्या संयोजनाने व बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या गायक कलाकार विद्यार्थ्यांनी  दिवाळी सणानिमित्त रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायकीतून 'स्वरसंध्या' कार्यक्रमातून बहारदार गीतं सादर केली.

चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्था ही शैक्षणिक उन्नती ,सामाजिक बांधिलकी बरोबरच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाविष्कारांसाठी सुप्रसिद्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी सचिन कुडतडकर, महेश तळगावकर, व मयूर पिंगुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील बाल गीत गायक व युवा विद्यार्थी गायक, शिक्षक यांच्या गीत गायन अदाकारीने रसिकांकांची मन जिंकणारा स्वरसंध्या कार्यक्रम लक्षवेधी ठरला ...

श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ च्या आग्रहाने सदर संस्थेच्या सर्व वयोगटातील गायक कलाकारांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला भक्ती गीत, भावगीत, अभंग, भारुड अशा विविध गीत प्रकारातील बहारदार गीतं स्वरसंध्या कार्यक्रमात सादर केली.

प्रफुल्ल वालावलकर, महेश  कुडाळकर, उमेश गाळवणकर , किशोर काणेकर यांच्या हस्ते व सुरेशं राऊळ, विलास बाक्रे,सुंदर  गाळवणकर व मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालेल्या या कार्यक्रमात

प्रा. योगिता शिरसाट-तिळवे यांच्या प्रसंगोचित, सुरेल सूत्रसंचालनाने अधिकच बहारदार ठरलेल्या या स्वरसंध्या कार्यक्रमांमध्ये पुढील विविध गीतं रसिकांची दाद देऊन गेली.. लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं बोलणं  ग मंजुळ  मैनेच (सौम्य नाईक),अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान   ( नचिकेत देसाई) यांनी गायिलेले गीत ,जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले , बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात ... ही संकेत पाटकर ने गायिलेली गीतं, तसेच 

 एका तळ्यात होती बदके पिले सुरेख - (संस्कृती सामंत), निशाणा तुला दिसला ना -(साईलीन वारंग)',निजरूप दाखवा वो हरिदर्शनास ध्या हो - (योगिता शिरसाट,) लक्षदीप हे उजळले घरी दारी - (सानवी खवणेकर),गगन सदन तेजोमय...,आली माझ्या घरी ही दिवाळी सप्तरंगात न्हाऊन  आली  दिवाळी, (-ऋचा कशाळीकर), हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली (प्राची केरकर),आई दर्शन घेईन मी(शमिका नाईक)यांनी गायलेली गाणी रसिकांच्या मनावर भूरळ घालणारी ठरली. याव्यतिरिक्त  , धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना(संकेत पाटकर व ऋचा कशाळीकर), चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी(संकेत पाटकर),देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा(सिया देसाई), पांडुरंग नामी लागलासे ध्यास,ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे रे (ऋचा कशाळीकर)अशी भावगीत, भक्तीगीते आणि या या शेजारणीने बरं केलं नाही ग बया हे कश्यपी तांबे ने गायिलेले भारूड रसिकांची दाद घेऊन गेले.

याबरोबरच सचिन कुडतडकर, महेश तळगावकर मयुर पिंगुळकर,रजत गाळवणकर, युवराज माधव,भार्गव चव्हाण,अक्षय साळगावकर यांच्या उत्तम संगीत साथीने कार्यक्रम अधिकच रंगतदार ठरला. 

विशेष म्हणजे *स्वरसंध्या* कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व गायक कलाकारांचा व वाद्यवृदांचा श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या वतीने व बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

एकूण या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर सीईओ अमृता गाळवणकर, डॉ.व्यंकटेश भंडारी, संस्था पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक वृंद, कर्मचारी तसेच कलाशिक्षक प्रसाद कानडे,श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला रसिक श्रोते, प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.