सर्वोदयनगरमधील रहिवाशांचं स्नेहसंमेलन

Edited by:
Published on: January 31, 2025 14:13 PM
views 338  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील सर्वोदयनगर रहिवासी बांधवांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत सर्वोदय नगरमधील सर्व बंधू-भगिनी, आबाल-वृद्ध एकत्र येत स्नेहसंमेलनाचा आनंद लुटला. यावेळी सर्व रहिवासी बांधवांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सौ. मेघना राऊळ यांच्या घरासमोरील गार्डनमध्ये स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आले. यावेळी सर्वोदय नगर धील लहान चिमुकल्यांपासून आबाल-वृद्धांनी आपल्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

यात अनेकांनी गायन, वादन, मिमिक्री, नृत्य, नकला, एकपात्री प्रयोग तसेच महिलांनी विशेष समूह नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. स्नेहसंमेलनानंतर स्नेहभोजन देखील आयोजित करण्यात आले होते. याचाही आस्वाद सर्वोदय नगरमधील सर्व उपस्थित बांधवांनी घेतला. सर्वोदयनगर निवासी संघाचे मुख्य प्रवर्तक व सामाजिक कार्यकर्ते सुनील राऊळ यांच्या अभिनव संकल्पनेतून आणि मेघना राऊळ व अजय गोंदावळे यांच्या पुढाकारातून या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून विद्याधर तावडे, सौ. तावडे, पुंडलिक राणे, श्री व सौ. कोरगावकर, श्रीमती दुःखंडे मॅडम, सौ. पटेल मॅडम, अस्मिता शिरोडकर व सौ. नार्वेकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. यावेळी महिलांसाठी विशेष 'हळदीकुंकू' कार्यक्रम देखील संपन्न झाला. या कार्यक्रमात ॲड. प्रकाश परब यांनी गायन केले तर प्रा. डॉ. बुवा यांनी गीत गायन,  प्रकाश राऊळ व मेघना राऊळ यांनी गीत गायन, अभिषेक राऊळ गीत गायन, हायजीन फिलिप यांनी उत्कृष्ट कीबोर्ड वादन सादर केले. तर अर्णव कोरगावकर देशभक्तीपर, गीत नित्या शंकर धुरी नृत्य आणि देशभक्तीपर गीत सादर करून आपल्या कलेचे दर्शन घडविले.       अमृता साटेलकर गीतगायन, अनुप्रिया अजित राणे नृत्य,, मानवी नाईक नृत्य, हार्दिक वसंत तावडे (अभिनय) - नाट्य सादर करून जंकफूड विषयी संदेश दिला तर वेदश्री अभिषेक पाल हिने नृत्य, अमृता शंकर धुरी - गायन, वीरा पडवळ - नृत्य, वासुदेव शिरोडकर यांनी गायन केले.शिवाय महिलांनी सादर केलेल्या समूह नृत्याला उपस्थितांची चांगलीच दाद मिळाली. या समूह नृत्यात अर्पिता मठकर, स्वरा मठकर, संध्या मठकर, करिष्मा शिरोडकर, अस्मिता शिरोडकर, ऐश्वर्या कोरगावकर, डॉ. दीप्ती बुवा, प्रज्ञा कोरगावकर, सुजल राऊळ, वर्षा पटेल, उर्मिला दुखंडे, शितल पाटील यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन अजय गोंदावळे व सुनील राऊळ यांनी केले. सूत्रसंचालन सुनील राऊळ व मेघना प्रकाश राऊळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन विनायक चव्हाण यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला सर्वच सर्वोदयनगर रहिवासी उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिका, नाटककार व लेखिका सौ. उषा परब याही कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

दरम्यान यावेळी सर्वोदयनगर मधील युवा कार्यकर्ता तेजस याचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी सर्वोदयनगर रहिवासी बांधवांतर्फे अशाच बहारदार कार्यक्रमांची मेजवानी देण्यात येणार असल्याचे मुख्य प्रवर्तक व सामाजिक कार्यकर्ते सुनील राऊळ यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील राऊळ, मेघना राऊळ, अजय गोंदावळे, सचिन नाटेकर, विश्वेश नाईक, अरुण पडवळ, वासुदेव शिरोडकर, रामदास कोरगावकर, ॲड. प्रकाश परब, उषा परब, आत्माराम नाईक, मीना सावंत, विद्याधर तावडे, प्रा. रुपेश पाटील, लक्ष्मीकांत कराड, लाडोजी सावंत, मच्छिंद्र मुळीक, विजय चव्हाण, पुंडलिक राणे, ॲड. राणे, शिवाजी गावित, प्रणाली नाईक, धनंजय डुबळे, प्रा. सुधीर बुवा, शांताराम गावडे, संजय नार्वेकर, आर. एस.  पाटील, विनीत तावडे, डॉ. अंकिता तावडे, ओवी तावडे, हार्दिक तावडे, विजय नाटेकर, संतोष मठकर, विनायक चव्हाण, श्रीकांत राऊळ, हायजिन लुईस फिलिप्स, मोहन पिळणकर, बाजीराव शिंत्रे, प्रदीप कोरगावकर, अशोक कोरगावकर, दीपक एंडेकर, प्रा. गणपत शिरोडकर यांसह तमाम सर्वोदय नगरातील रहिवासी बंधू भगिनी यांनी प्रयत्न  केले.