
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या टेम्पो चालकाने तीन ते चार वाहनांना धडक दिली. सोमवारी ही अपघाताची घटना घडली असून कोणतीही जीवितहानी झाली नाहीय. परशुराम घाटातून येणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं हा अपघात झाला. जवळपास तीन ते चार वाहनांना या टेम्पोची धडक बसल्याने विचित्र अपघात झाला. परिणामी, महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली.
मुंबई-गोवा महामार्गावर नेहमीच वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळतात. पंरतु, या महामार्गावरून अवजड वाहने घेऊन जाणारे चालक सर्रासपणे दारू पिऊन वाहने चालवत असल्याचं आज पुन्हा एकदा समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका टेम्पो चालकाने परशुराम घाटात तीन-चार वाहनांना धडक दिली. टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.