विनायक राऊतांच्या 'त्या' वक्तव्याचा विपर्यास | जागा सेनेकडेच राहण्यासाठी प्रयत्न

Edited by: विनायाक गावस
Published on: June 22, 2023 15:50 PM
views 83  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदार संघ गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे सावंतवाडीची जागा शिवसेनेकडे राहण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा मिडियानं विपर्यास केला. त्यांनी फक्त ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यास अर्चना घारेंना मदत करू असे सांगितल्याच विधान ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले. 

तर शिवसैनिकांची गद्दारी करून दीपक केसरकर शिंदे गटात गेले त्या केसरकारांनी कुठल्याही पक्षातून पुन्हा निवडणूक लढवावी येथील जनता त्यांचा निश्चितच पराभव करेल असा दावाही त्यांनी यावेळी केला. यावेळी सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश रावळ दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्यासह बाळा गावडे ,मायकल डिसोजा, शब्बीर मणियार,वेत्ये सरपंच गुणाजी, चंद्रकांत कासार, गावडे, सुनील गावडे, श्रुतिका दळवी, भारती कासार, शिवदत्त घोगळे, आबा सावंत आदी उपस्थित होते.