
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डीएड पदविकाधारक बेरोजगारांचे आंदोलन सुरू असून, या आंदोलनाचा सोमवार आजचा सातवा दिवस आहे. आज या आंदोलनाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली आणि या आंदोलनाच्या शिष्टमंडळाला मुंबई मंत्रालय येथे या विषयावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी यावे असे निमंत्रण दिले. यानुसार डीएड बेरोजगार संघर्ष समितीचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले असून, या शिष्टमंडळात अध्यक्ष विजय फाले, प्रमोद डीचोलकर,शिवप्रसाद नाटेकर,रणजित कळणेकर,उपाध्यक्ष स्वराली वाक्कर, सचिव गौरी आडेलकर,तेजल रावले आदींचा समावेश आहे.
आता या उद्याच्या बैठकीकडे सर्वानेचेबपक्ष लागले आहेत.मात्र तो पर्यंत डीएड बेरोजगार संघटनेच्या वतीने सुरू असलेले आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.