देवगड : देवगड तुळशीनगर येथील पडक्या घरामध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांना आढळून आला आहे. हा मृतदेह सुमारे ५६ ते ६० वयोगटातील असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास देवगड पोलिसांकडून केला जात आहे.
अज्ञात व्यक्तीचा मृतदेह देवगड तुळशीनगर येथे सापडल्यामुळे खळबळ उडाली. देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, सहा पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव, हेड कॉन्स्टेबल उदय शिरगावकर पोलीस नाईक बिर्जे, नाटेकर पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील इत्यादी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून या घटनेची माहिती घेतली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही व्यक्तीचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला आहे. मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याचे दिसून आले. अंगावर शर्ट व हाफ पॅन्ट असल्याचे दिसून येत आहे. ही व्यक्ती मागील तीन, चार दिवस त्या परिसरात फिरत होता. तो मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे.