
सावंतवाडी : मराठा समाजाच्यावतीने एक दिवस स्वराज्याच्या दैवतासाठी कार्यक्रम सायंकाळी सात वाजता मोती तलावाच्या काठावर श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या पुतळ्या जवळ राबविण्यात आला. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते यावेळी दिवा पेटविण्यात आला. एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजीचा जयघोष याप्रसंगी करण्यात आला.
यावेळी मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहून दिवे लावून या अभियानास प्रतिसाद दिला. यानंतर सावंतवाडी शहरात सर्व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आणि गावोगावी दिवे लावण्यात आले. यावेळी युवराज लखमराजे भोसले, अभिषेक सावंत, विशाल सावंत,सकल मराठा समाज तालुका अध्यक्ष सिताराम गावडे, सुनील सावंत , पुंडलिक दळवी, सौ भारती मोरे, प्रसाद राऊळ, दिगंबर नाईक, संतोष शेडगे, सतीश बागवे, सौ संयुक्ता सावंत, सोहम सावंत, अॅड संतोष सावंत, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, उमेश सावंत, सतीश सावंत, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, अँड धीरज सावंत आधी उपस्थित होते.