तिलारी घाटात दरड कोसळली...!

Edited by: लवू परब
Published on: August 08, 2024 10:07 AM
views 567  views

दोडामार्ग : सतत सुरु असलेल्या पावसामुळे आज तिलारी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. मात्र, यात कोणतीही जीवित हानी या अपघात घडला नाही. प्रवास करत असलेल्या काही वाहन चालकांनी रस्त्यावर आलेले दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मात्र, असाच पाऊस तिलारी परिसरात पडत राहिलास अजूनही दरड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तिलारी घात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

काल पासून तिलारी परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने आज तिलारी घाटात रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. काही दगड माती रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक बंद झाली होती. मात्र, त्याचं मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहन चालकानी काही वेळ थांबून संभाव्य  धोका तळल्याचे पाहून रस्त्यावर पडलेले दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. जरी वाहतूक सुरळीत केली असली तरी आता घाट रस्त्यातून प्रवास करणे भीतीचे बनले आहे. एकीकडे अवजड वाहतुकीसाठी घात रस्ता बंद केला होता त्यात 8 फुटावरचा गाड्याना वाहतुकीस पूर्णता बंदी घालण्यासाठी लोखंडी कमान उभारल्या होत्या. एकीकडे घाट बंदी आणि आता कोसळणाऱ्या दरडी भविष्यात हा तिलारी घाट सर्वच वाहतुकीस बंद तर होणार नाही ना ? असही म्हणण उचित ठरत नाही.