
सावंतवाडी : शहरातील सबनिसवाडा येथे प्लॅटमध्ये राहणाऱ्या महाविद्यालयीन युवतीने फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सायकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांच्या प्राथमिक तपासात सततच्या एकटेपणाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे कारण समोर आले आहे. सावंतवाडी शहरातील महाविद्यालयात इयत्ता अकरावी सायन्स मध्ये ही युवती शिक्षण घेत होती. ती मुळ दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव टाकवाडी येथील असून सावंतवाडी शहरात सबनीसवाडा येथे ती प्लॅटमध्ये एकटीच राहत होती. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक करीत आहेत.