'त्या' आत्मदहन प्रकरणात विरोधी नगरसेवकांचा हात ?

नगराध्यक्षांचं पोलीसांना निवेदन ; सखोल चौकशी करण्याची मागणी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 06, 2024 08:22 AM
views 853  views

वैभववाडी : शहरात स्टॉलधारक महीलेने आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या 'त्या' प्रकाराची सखोल चौकशी व्हावी // नगराध्यक्षा नेहा माईणकर यांची पोलीसांकडे मागणी // सहायक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांना दिलं निवेदन // शहरात घडलेली ही घटना संशयास्पद // हा होता पुर्व नियोजित कट // ही घटना घडत असताना स्वीकृत नगरसेवक मनोज सावंत होते उपस्थित // सावंत हे कोणत्या उद्देशाने होते त्याठिकाणी होते उपस्थित // त्यांचे आणि त्या महीलेचे काही संभाषण झाले आहे का? // त्या महीलेचे कॉल रेकॉर्डची व्हावी तपासणी // त्या महीलेने डिझेलच ओतले याची व्हावी शहानिशा // जर ते डिझेल असेल तर ते कुठून खरेदी केले // कोणी आणून दिले याची सिसीटिव्ही च्या माध्यमातून व्हावी चौकशी // शहरात एवढ्या प्रमाणात बॉटलमधून डिझेल मिळत नसताना सुद्धा ते कसे उपलब्ध केले याचा व्हावा तपास //घटनेच्यावेळी व्हिडिओमध्ये जी विरोधी पक्षाची मंडळी उपस्थित होती त्यांच्यावर आमचा दाट संशय // सदर महीलेला यांनीच टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडले // स़ध्या यांचं व्यक्तींकडून समाजात दुफळी माजण्याची दृष्टीने केली जात आहेत वक्तव्ये // ती महीला एवढा टोकाचा निर्णय नाही घेऊ शकत // फुस लावल्याशिवाय हा प्रकार नाही घडला // फुस लावणा-या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात करावी कायदेशीर कारवाई // माईणकर यांनी निवेदनाद्वारे केली मागणी //