
सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे सांगेली येथील नवोदय विद्यालयाला भेट देण्यासाठी दाखल झाले आहेत. काल 159 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर दीपक केसरकर यांनी आज तात्काळ भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दीपक केसरकर आज सकाळीच मुंबईहून तितडीने रवाना झाले आहेत. येथे दाखल होताच दीपक केसरकर हे प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी प्राचार्य एम.के.जगदीश यांना चांगलेच धारेवर धरले. अशा पद्धतीने मनमानी वागत असाल तर तुम्हाला तत्काळ निलंबित करणार अशा शब्दात सुनावले आहे. यांचा चौकशी अहवाल घेवून तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दीपक केसरकर यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेशही दीपक केसरकर यांनी दिले आहेत. या घटनेने नवोदय विद्यालयाच्या कारभाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दीपक केसरकर हे नवोदय विद्यालयात ठाण मांडून असून कागदपत्रांची स्वतः तपासणी करत आहेत.