
सिंधुदुर्गनगरी : मानसून पूर्व पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली हजारी गडगडाट आणि लखलखाट यांसह लावली आहे.याचा फटका जिल्ह्याला बसू लागला आहे.सोमवारी कसाल येथील गोविंद सोनू कावले यांच्या सुमारे पाच ते सहा वर्षे वयाच्या म्हैसीवर वीज कोसळून ती जागीच मृत झाली. यामुळे श्रीकावले यांचे सुमारे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसाने गेल्या काही दिवसांपासून सुरुवात केली आहे. विजांचा लखलखाठ आणि ढगांच्या गडगडाटासह त्याचबरोबर वादळी वाऱ्यासह या पावसाने आपल आगमन केले आहे. यावर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे अक्षरशा होरपळून गेलेल्या सिंधुदुर्गवासीयांना यामुळे थोडा थंडावा मिळाला आहे. असे असले तरीही वादळी वाऱ्यामुळे बऱ्याच ठिकाणी झाडांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. तर वीज खांब आणि वीज वाहिन्या तुटल्याने विद्युत कंपनीचे ही मोठे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळीकडे या पावसाचे आगमन झाले असले तरी कसाल मध्ये मात्र सोमवारी दुपारी या पावसाने अचानक सुरुवात केली.
या पावसाच्या आगमनासोबत ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट मोठ्या प्रमाणात होता. या विजांच्या लखलखाटात दुपारी सुमारे दोन वाजून 30 मिनिटांनी कसाल बालमवाडी येथे राहणारे गोविंद कावले यांच्या घरासमोर बांधून ठेवलेल्या म्हैशीवर विजेचा लोळ कोसळला आणि ही म्हैस जाग्यावरच मृत झाली. यामुळे श्री कावले यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची बातमी समजतात कसाल सरपंच राजन परब, तलाठी संतोष बांदेकर यांच्यासोबतच ग्रामपंचायत सदस्य मिलिंद सावंत आदींसोबत ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला श्री कावले यांचे सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सोबत फोटो वीज कोसळून मृत झालेल्या म्हैशीची पाहणी करून पंचनामा करताना कसाल सरपंच राजन परब, तलाठी संतोष बांदेकर, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद सावंत आदी.