जानवलीत घरावर कोसळली फांदी

कणकवलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
Edited by:
Published on: May 27, 2025 13:07 PM
views 215  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवलीत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील झपाट्याने वाढ झाली आहे. कणकवली तालुक्यातील जाणवली येथे एका घरावर सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास फणसाच्या झाडाची फांदी घरावर कोसळली. त्यामुळे घरावरील पत्रे आणि घरातील सामानाच मोठं नुकसान झाले आहे.

घरातील व्यक्तींनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सकाळी ६ वाजता च्या सुमारास झोपेत असताना  मोठा आवाज आला म्हणून उठून पहाणी केली तर फणसाच्या  झाडाची फांदी घरावर कोसळली होती. घरातील फ्रीज आणि छप्परावरील पत्रे देखील मोठ्या प्रमाणात फुटून नुकसान झाले होते. तर भिंतींना क्रॅक देखील गेले. प्रशासनाला याबाबत माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे या नुकसानभरपाईत प्रशासनाची मदत मिळेल अशी आशा देखील नुकसानग्रस्तांनी व्यक्त केली आहे.