वालावल कवठी मार्गावर पडले भले मोठे झाड | वाहतूक सुरळीत

Edited by: भरत केसरकर
Published on: July 06, 2023 17:03 PM
views 154  views

कुडाळ : वालावल कवठी मार्गावर आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास भले मोठे झाड कोसळून मार्गावरची वाहतुक ठप्प झाली होती. तेथील ग्रामस्थ गोविंद भगत आणि चेंदवण हायस्कूलचे नाईक सर यांच्या मदतीने रस्त्यावरती कोसळलेली झाडे मशीनच्या साह्याने तोडून रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. तब्बल एक तासानंतर कुडाळ - वालावल - कवठी मार्गावरची वाहतूक सुरळीत झाली.