
वैभववाडी : तालुक्यातील तिथवली नाऊळदेवाडी येथील सात वर्षीय बालकाचा कणकवली रुग्णालयात नेत असताना वाटेतच दुदैवी मृत्यू झाला. अनिकेत अंकुश कुडाळकर असे त्या बालकाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. ही घटना समजताच गावात हळहळ व्यक्त होत आहे.
अनिकेत हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. औषधोपचार करुनही त्याची प्रकृती सुधारत नव्हती. मंगळवारी त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला तिथवली येथून कणकवली ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत होते.
दरम्यान कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासल्यावर असता तो मृत घोषीत केले. त्याच्या पश्चात आई वडील तीन भावंडे असा परिवार आहे.