
देवगड : जमसंडे येथील एका २५ वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आपले जीवन संपवल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे.
जामसंडे शांतीनगर येथील एका २५ वर्षीय अवधूत मनोहर धुवाळी या युवकाने सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आपल्याला राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. या संदर्भात त्यांचा भाऊ अमोल मनोहर धुवाळी यांनी देवगड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्या फिर्यादीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा हवालदार विजय बिर्जे अधिक तपास करत आहेत.