ओल्ड गोवा येथील २० वर्षीय युवकाचा शिरवल नदीत बुडून मृत्यू

तीन मित्रांच्या मैत्रीवर काळाचा घाला
Edited by: संदीप देसाई
Published on: April 13, 2023 09:11 AM
views 873  views

दोडामार्ग: दोडामार्ग तालूक्यातील शिरवल नदीवर न्हयखोल येथे आंघोळीसाठी गेलेल्या एका २० वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी समोर आली आहे. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यात ओल्ड गोवा येथील (सध्याचे वास्तव्य मणेरी) अक्षय विष्णू कुलकर्णीकर (वय २० ) याचा मृत्यू झाला आहे.

   मिळालेल्या माहितीनुसार मृत अक्षय व त्याचे दोडामार्ग तालुक्यातील दोन मित्र असे तिघेजण शिरवल गावातील वाहणाऱ्या नदीवर पर्यटन आणि आंघोळीसाठी गेले होते. शिरवल नदीवर न्हायखोल सात बाय हे ठिकाण पर्यटक व नदीवर आंघोळ करणाऱ्या पर्यटकांना खुणावत आहे. नेमंक याच ठिकाणी आपल्या अन्य दोन राज व अक्षय गवस या मित्रांसह अक्षय कुलकर्णी गेला होता. मात्र दुपारी जेवणाच्या वेळी अक्षय कुलकर्णीकर बुडण्याचा प्रकार घडला. सोबत असलेल्या पर्यटक व अन्य लोकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला पण तोवर वेळ गेला होता. सायंकाळी चार नंतर ही घटना समजताच दोडामार्ग पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.