सावंतवाडी : भटवाडी येथे तब्बल १२ फुटी अजगर आढळला. स्थानिक युवकांनी हा अजगर पकडून सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडला. काल रात्री हा अजगर दिसून आला. त्याला पाहताच नागरिकांची तारांबळ उडाली. यावेळी कुणाल शृंगारे, भैय्या सावंत, रमेश परब, चंदन नाईक, वैभव केंकरे आदींनी त्या अजगराला पकडून अजगराला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले.