
रत्नागिरी : प्रतिवर्षाप्रमाणे रत्नागिरी एसटी विभागाला गणपती बाप्पा पावला आहे. उत्सवकाळात एसटीच्या जादा फेऱ्यांमुळे विभागाला २ कोटी ७२ लाख ६४ हजार ९२१ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गणपती उत्सवामध्ये रत्नागिरी एसटी विभागाने २ हजार ६११ जादा फेऱ्या सोडल्या. गणेशभक्तांसाठी नियमित फेऱ्या सुरू होत्या. त्यात परतीच्या प्रवासाकरिता जादा फेऱ्यांचे नियोजन केले. ८ लाख २२ हजार ९०३ किमीच्या या फेऱ्या झाल्या. यातून एसटी विभागाला २ कोटी ७२ लाख ६४ हजार ९२१ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. जादा फेऱ्यांमधून जवळपास ९३ हजार २४६ प्रवाशांनी प्रवास केला आहे.
एसटी महामंडळाने मुंबईकर चाकरमान्यांना कोकणात गणेशोत्सवात येण्यासाठी अडीच हजारहून अधिक गाड्या सोडल्या होत्या. बोरिवली, ठाणे, दादर, मुंबई, पुणे आदी भागांतून या गाड्या कोकणात आल्या. ७ ते १७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर परतीच्या प्रवासासाठी एसटी विभागाने जादा गाड्या सोडल्या. ग्रुप बुकिंगसाठी चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास २६११ गाड्या परतीसाठी आरक्षित झाल्या. या सर्व गाड्यांमधून लाखभर गणेशभक्त मुंबई, ठाणे, बोरिवली, पुण्यात परतले.
गणपती जादा वाहतूक आकडेवारी
आगाराचे नाव फेऱ्या उत्पन्न प्रवासी संख्या
दापोली २३२ १५,४१,६९७ ६२२५
खेड ५१२ ३२,०२,१२१ १५,४८१
चिपळूण ३७० ३१,९३,८१५ १२,५८२
गुहागर ३०९ ५७,८३,४०९ ११,०८४
देवरूख ३०१ ४३,६१,३८३ १५,०८४
रत्नागिरी ३१८ २४,२६,५०४ १४,६७३
लांजा २३० २८,२९,२३५ ७९३१
राजापूर २३० २९,०८,७१५ ६३६३
मंडणगड १०९ ९,२८,०४२ २८२३
-------------------------------------------------------
एकूण २६११ २,७२,६४,९२१ ९३२४६