
सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचा १२ वीचा निकाल ९९.६५ टक्के एवढा लागला आहे. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स विभागात २८६ पैकी २८५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यात प्रशालेत प्रथम साईश कांबळी ८६.३३ टक्के, द्वितीय सानिया आंगचेकर ८४.६७ टक्के तर मॅकलीन लोबो ८२.३३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. आर्ट्स विभागात सानिया आंगचेकर ८४.६७ टक्के प्रथम, दिशा नाईक ७५.८३ टक्के द्वितीय, सोनालीका पेडणेकर ६५.३३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर कॉमर्स शाखेत सोहा सावंत ७८.५० टक्के प्रथम, द्वितीय निशिगंधा सावंत ७४.८३ टक्के तर तृतीय प्रिती पुरोहित ७७.३३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. सायन्स शाखेतून साईश कांबळी ८६.३३ टक्के प्रथम, ८२.३३ टक्के मॅकलीन लोबो द्वितीय, लावण्या रेडकर ८२ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, राजकन्या उर्वशीराजे भोंसले तसेच प्राचार्य , उपप्राचार्य व प्राध्यापक तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालयाकडून अभिनंदन करण्यात आले आहे.