दोडामार्ग : कोकण पदवीधर मतदार निवडणुकीसाठी दोडामार्ग तालुक्यात ८४.४५ टक्के मतदान झाले. १०६८ मतदारांपैकी ९०२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
यात ५८३ पुरुष व ३१९ महिलांनी मतदान केले. हि मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कोकण पदवीधर संघासाठी मविआचे उमेदवार रमेश कीर व महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्यात निवडणूक रंगली. यासाठी दोडामार्ग मतदान केंद्रावर बुधवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांनी बुथ लावले होते. सकाळी ७ वा पासून मतदानाला सुरुवात झाली. एकूण १०६८ मतदारांपैकी ९०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.