आरोस विद्या विहारचा 84.21 टक्के निकाल ; समिधा कांबळी प्रथम

Edited by: ब्युरो
Published on: May 25, 2023 17:05 PM
views 127  views

सावंतवाडी : आरोस येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महविद्यालयाचा निकाल ८४.२१ टकके लागला आहे. समिधा प्रशांत कांबळी ७९.३३ टक्के गुण मिळवून कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम आली. श्रेया राजाराम परब ७८ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर रजनी उमेश रेडकर ६९.३३% मिळवून तृतीय आली.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष निलेश परब, स्कूल कमिटी चेअरमन ,हेमंत कामत ,सचिव शांताराम गावडे ,सर्व संस्था पदाधिकारी, संचालक, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर ,शिक्षकेतर कर्मचारी व पालक शिक्षक संघाने अभिनंदन केले आहे.