पहिल्या टप्प्यात वेंगुर्ला तालुक्यात ८.१९ % मतदान..!

Edited by: दिपेश परब
Published on: May 07, 2024 05:07 AM
views 285  views

वेंगुर्ला : लोकसभा निवडणुक २०२४ मतदानाला सुरूवात // पहिल्या टप्प्यात वेंगुर्ला तालुक्यातील ८.१९ % मतदान // सकाळ पासून संथ गतीने मतदान // १२ वाजेनंतर मतदानाच्या टक्क्यात वाढीची शक्यता// तालुक्यात एकूण ९३ मतदान केंद्रावर होणार मतदान// ६६ हजार ९१८ आहेत एकूण मतदार// सकाळी ७ पासूनच मतदान केंद्रावर मतदारांची ये जा- सुरू // मात्र मतदारांच्या रांगा नाही// महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे व इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्यात थेट लढत// एकूण नऊ उमेदवार आहेत निवडणूक रिंगणात // केंद्रीय उद्योग मंत्री भाजप नेते नारायण राणे, यांच्यासह बहुजन समाजवादी पार्टीचे राजेंद्र आयरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे विनायक राऊत, बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक पवार, वंचित बहुजन आघाडीचे मारुती जोशी, सैनिक समाज पार्टीचे सुरेश शिंदे, व तीन अपक्ष उमेदवार म्हणून अमृत तांबडे, विनायक लवू राऊत, शकील अब्दुल करीम सावंत असे नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात //