सह्याद्रीत ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Edited by: मनोज पवार
Published on: August 16, 2025 18:55 PM
views 47  views

सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने 79 वा स्वातंत्र्य दिन सह्याद्री क्रीडा संकुलावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संचालक मारुतीराव घाग यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीत, ध्वजगीत व प्रतिज्ञा पठणानंतर महाराष्ट्र छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला सलामी दिली. अमृता घाग यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सुमधुर सादरीकरण केले.

या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त चंद्रकांत सुर्वे, मारुतीराव घाग, आकांक्षा पवार, सचिव महेशजी महाडिक, प्रकाशजी राजेशिर्के, प्रशांत निकम, माजी पंचायत समिती सभापती सौ. पूजाताई निकम, युवा नेते अनिरुद्ध निकम, गावचे सरपंच, ग्रामस्थ, पालक तसेच विविध शाखांचे प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे, अमृत कडगावे, रोहित गमरे व प्रशांत सपकाळ यांनी केले.

दरम्यान, गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय समितीचे चेअरमन व ज्येष्ठ संचालक शांताराम खानविलकर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी शैक्षणिक प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना शिक्षणप्रेमींच्या ठेवीवरील व्याजातून बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. फुटबॉल स्पर्धेत यश मिळवलेल्या मुलींच्या संघाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.