
सावंतवाडी: देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन भोसले नॉलेज सिटीमध्ये आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना अर्पण करण्यात आली.
यावेळी संस्थेचे सचिव संजीव देसाई, सदस्या सानिका देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी लेफ्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, सर्व संस्थांचे प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना अच्युत सावंतभोसले यांनी 'विकसित भारत' ही संकल्पना साकारण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला सक्षम व कौशल्यसंपन्न बनवावे, जेणेकरून देश उभारणीत महत्त्वाचे योगदान देता येईल असे आवाहन केले. सिन्हा यांनी भारत जागतिक महाशक्ती म्हणून सिद्ध झालेला आहे आणि बीकेसीच्या माध्यमातून आपण देशाचे हात बळकट करायला हवे असे सांगितले. प्राचार्य डॉ. रमण बाणे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत “ज्ञान, मूल्य आणि शिस्त यांच्या माध्यमातून देश घडवण्यासाठी कटिबद्ध होऊ या” असे आवाहन केले. यावेळी देशभक्तीपर घोषणांनी-भारत माता की जय आणि वंदे मातरम-परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमर प्रभू व प्रा.गायत्री आठलेकर तर आभार प्रदर्शन प्रा.बॉनी शेराव यांनी केले.