अस्मसा आर्ट अकॅडमीच्या 7 विद्यार्थ्यांची जे. जे.त प्रवेश

पहिल्याच प्रयत्नात सीईटी उत्तीर्ण
Edited by: विनायक गांवस
Published on: September 13, 2025 13:38 PM
views 133  views

सावंतवाडी : येथील अस्मसा आर्ट अकॅडमीच्या ७ विद्यार्थ्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे प्रवेश मिळवून यश संपादन केले आहे. ही सावंतवाडीसाठी अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे, या सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात सीईटी परीक्षा उत्तीर्ण करून हे यश मिळवले आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत सई कासकर, मिहिर धामापूरकर, भाग्यलक्ष्मी तावडे, कुणाल तिवटणे, मृदुला देसाई, तानिया गावडे, आणि विलास तवटे या सर्व विद्यार्थ्यांनी गेली चार वर्षे अस्मसा आर्ट अकॅडमीमध्ये कला शिक्षण घेतले आहे. विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे, या विद्यार्थ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातून पहिल्या ५० क्रमांकामध्ये येऊन आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरवर्षी साधारणपणे ५ ते ६ हजार विद्यार्थी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देतात. अशा मोठ्या स्पर्धेतून अस्मसा अकॅडमीच्या ७ विद्यार्थ्यांनी मेरिटमध्ये येणे हे त्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि योग्य मार्गदर्शनाचे प्रतीक आहे.

गेल्या काही वर्षांपासून अस्मसा आर्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा यशाचा आलेख वाढतच आहे. पहिल्या वर्षी २, त्यानंतर ५, आणि आता तब्बल ७ विद्यार्थ्यांना जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळाला आहे. या यशाबद्दल अस्मसा आर्ट अकॅडमीचे चित्रकार सत्यम मल्हार, अक्षय सावंत, प्राची सावंत, आणि करिश्मा धुरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच या विद्यार्थ्यांनी कलेच्या या सर्वोच्च संस्थेत प्रवेश मिळवण्याचे स्वप्न साकार केले.