महाराष्ट्राचा ६५ वा स्थापना दिन | पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण

Edited by:
Published on: April 30, 2024 08:54 AM
views 197  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्याचा 65 वा स्थापना दिन समारंभ बुधवार 1 मे 2024 रोजी साजरा करण्यात येणार असून ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी 8.00 वाजता पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मुख्यालय, पोलीस परेड ग्राऊंड येथे होईल अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली आहे.  ध्वजारोहणानंतर सकाळी 8.15 वा. पोलीस व  राखीव व पोलीस दल यांचे संचलन होणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व वीरमाता, विरपिता, शौर्य पुरस्कार विजेते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी, इतर मान्यवर, विद्यार्थी आणि नागरिकांनी उपस्थित रहावे.

दि 1 मे 2024 रोजी सकाळी 7.15 ते 9.00 या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 7.15 वाजेच्या पूर्वी  किंवा 9.00 वाजेनंतर आयोजित करावा. समारंभाला राष्ट्रीय पोषाखात यावे. आचार संहितेचे पालन करुन नियमांचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.