कलमठ - कणकवली रक्तदान शिबीरात ६५ रक्तदात्यांनी केलं रक्तदान...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 11, 2023 20:15 PM
views 93  views

कणकवली : दि. ८ जुलै रोजी कै. दिपलक्ष्मी दत्ताराम मडव यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ रक्तमित्र अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली आयोजित रक्तदान शिबीर कलमठ ग्रामपंचायत हॉल येथे आयोजित केले होते. शिबिरामध्ये ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

कार्यक्रमाचे उद्घाटन कलमठ सरपंच श्री संदिप मेस्त्री यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश तेंडोलकर सर, मा. पं. स. महेश लाड, ग्रामपंचायत सदस्य नितिन पवार, धीरज मेस्त्री, दिनेश गोठणकर, अनूप वारंग, वैभववाडी- कणकवली विभागीय संघटक मकरंद सावंत, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली तालुकाध्यक्ष अमोल भोगले, कार्याध्यक्ष अभिषेक नाडकर्णी, जिल्हा सदस्य विठ्ठल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते आबा कोरगावकर, विजय चिंदरकर, विनय हडकर, श्री केशव पावसकर, श्री ज्ञानेश्वर काळे, श्री प्रदिप सावंत, श्री दीपक महाडिक आदी उपस्थित होते. 

रक्तमित्र अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरास ७५ रक्तदात्यांनी हजेरी लावली त्यापैकी ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर १० रक्तदाते तांत्रिक कारणास्तव रक्तदान करू शकले नाहीत. यावेळी रक्तदात्यांना सुपारीची रोपे देऊन गौरव करण्यात आला. सर्व रक्तदात्यांचे अमेय मडव यांनी आभार मानले. रक्तदाते योगेश(बाळू) चव्हाण आणि त्यांची पत्नी प्राची चव्हाण या उभयतांनी रक्तदान केले. सौ प्राची चव्हाण यांचे आजचे हे पहिलेच रक्तदान आहे.

कार्यक्रमाला कलमठ ग्रामपंचायत सदस्य सचिन खोचरे, अक्षय मोरे, प्रमोद लिमये, दिपेश सावंत, किरण सामंत, स्नेहल हजारे, दुर्गाप्रसाद काजरेकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुषार पावसकर, योगेश जाधव, सर्वेश राणे, सदाशिव(बाबू) राणे, माणिक वाघमारे, योगेश चव्हाण, आशिष राणे आदींनी प्रयत्न केले. या शिबिरासाठी श्री देव काशिकलेश्वर सभागृह कलमठ ग्रामपंचायत हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामपंचायत कलमठ आणि जिल्हा रुग्णालय, रक्तपेढीने वैद्यकीय स्टाफ उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांनी आभार मानले.