
सावंतवाडी : इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणी जामीन मंजूर झाला असून आरोपीच्या वतीने वकील स्वप्नील कोलगांवकर यांनी काम पाहिले.
दिनाक २३/३/२०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांस आरोपी संजय मोहिते, योगेश मोहिते, अंकुश चव्हाण, अक्षय चव्हाण, शोभा मोहिते, माधुरी चव्हाण यांनी बेदम मारहाण केली होती. यात आरोपी योगेश मोहिते याने हाताची कैची करून गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला व संजय मोहिते यांनी पहार घेऊन मारण्याचा प्रयत्न केला. बाकीनी लाथा बुक्यांनी मारहाण केली अशी फिर्याद दिल्यावरून त्यांना अटक करण्यात आली होती.
दोन दिवसाची पोलीस कोठडी झाल्यानंतर आरोपीचे वकील स्वप्नील कोलगावकर यांनी जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज केला. मे न्यायालयाने आरोपी याची अटी व शर्ती सह ५० हजार च्या जामिनावर मुक्तता केली आहे.