मालवणातील आरोग्य शिबिरात ५६० जणांची तपासणी

२२ जणांनी केले रक्तदान
Edited by:
Published on: March 09, 2025 11:56 AM
views 178  views

मालवण : जागतिक महिला दिन व स्वराज्य ढोल-ताशा पथक वर्धापन दिनानिमित्त सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ, स्वराज्य संघटना, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, मातृत्व आधार फाऊंडेशन, वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर, सिंधुदुर्ग व पडवे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीरात ५६० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच यावेळी २२ जणांनी रक्तदान केले. 

या शिबिराचे उदघाट्न मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे व  जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस  यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व शिवप्रतिमेस पुष्पहर अर्पण करून झाले. यावेळी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष, वाइल्ड रेस्क्यूअर सिंधुदुर्गच्या सल्लागार सौ. शिल्पा खोत, मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे, सचिव दादा वेंगुर्लेकर, लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष बाळू अंधारी, क्रीडा अधिकारी शितल शिंदे, क्रीडामागदर्शक माधुरी घराळ आदी व इतर मान्यवर उपस्थित होते. 

या शिबिरात हृदयरोग तपासणी, युरोलॉजी तपासणी, जनरल सर्जरी, कर्करोग तपासणी, प्रसुतीशास्त्र, स्त्रीरोग तपासणी, नेत्र तपासणी, अस्थिरोग तपासणी, नेफ्रोलॉजी तपासणी, दंतरोग चिकित्सा करण्यात आली. ५६० जणांची तपासणी करण्यात आली. रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. यामध्ये मोतीबिंदूच्या ५० रुग्णांचे निदान झाले असून त्यांच्यावर शासकीय योजनेतून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेजच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी तहसीलदार वर्षा झाल्टे व जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांचा विशेष सन्मान सौ. शिल्पा खोत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्वराज्य ढोल ताशा पथकाचा वर्धापन दिन केक कापून साजरा झाला. यावेळी माजी नगरध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगरसेवक यतीन खोत, मंदार केणी, दर्शना कासवकर, भाई कासवकर, शांती तोंडवळकर, साक्षी मयेकर, नाभिक समाज जिल्हाध्यक्ष प्रतिभा चव्हाण, स्वाती तांडेल, अश्विनी आचरेकर, दिक्षा लुडबे, लायन्स क्लबचे मुकेश बावकर, महेश कारेकर,गणेश प्रभुलीकर,राजा शंकरदास, अनुष्का चव्हाण, अंजली आचरेकर, रेखा गावकर, नंदिनी गावकर, मनाली दळवी, मानसी घाडीगावकर तसेच ललित चव्हाण, भाऊ सामंत, नंदा सारंग, अंजना सामंत आदी उपस्थित होते.