शिरोड्यातील नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना विशाल सेवा फाउंडेशन मार्फत पन्नास हजारांची मदत

शिरोडा व्यापारी, ग्रामस्थांकडूण एकूण ७ लाखांपेक्षा जास्त मदत जमा
Edited by: दिपेश परब
Published on: February 26, 2023 11:23 AM
views 383  views

वेंगुर्ला: 

शिरोडा बाजारपेठ येथे २४ फेब्रुवारी रोजी आग लागून व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले होते यांना मदत मिळावी म्हणून काल २५ रोजी दुपारी सर्व बाजारपेठ बंद ठेऊन श्री माऊली सभागृह येथे शिरोडा पंचक्रोशी तील व्यापारी व ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये शिरोडा व्यापारी संघटनेकडे उपस्थित असलेल्या व्यापारी व ग्रामस्थांकडून सुमारे ७ लाखांपेक्षा जास्त आर्थिक मदत जमा झाली. यावेळी भाजप शिरोडा शहर यांच्याकडून पाठपुरावा केल्यामुळे विशाल सेवा फाऊडेशनचे उद्योजक तथा भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्याकडून पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत व त्याचबरोबर प्रत्येक उपस्थित भाजप, पदाधिकारी यांनी आपली वैयक्तिक आर्थिक मदत शिरोडा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजन शिरोडकर यांच्याकडे सपूर्त केली.

     या वेळी भाजपचे रेडी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ,  तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, माजी सरपंच मनोज उगवेकर, माजी उपसरपंच राहुल गावडे, विद्यमान सदस्य मयूरेश शिरोडकर, हेतल गावडे, अर्चना  नाईक, रेडी सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नमिता नागोळकर, आरवली ग्रामपंचायत सरपंच तातोबा कुडव, उपसरपंच रिमा मेस्त्री, भाजप शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी, उपाध्यक्ष संतोष अणसूरकर, शहर ज्येष्ठ पदाधिकारी अनिल गावडे, चंद्रशेखर गोडकर, शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख विदयाधर धानजी उपस्थित होते. यावेळी शासन स्तरावर नुकसान मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन भाजप रेडी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ यांनी सांगितले.