जेष्ठ नागरिकांसाठी उद्योजक विवेकानंद नाईक यांची ५० हजारांची देणगी

Edited by:
Published on: April 22, 2024 13:42 PM
views 210  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच महाराज हॉल मध्ये संघाचे अध्यक्ष दिनकर उगवेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  यावेळी बांदा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक विवेकानंद नाईक, सामाजिक कार्यकर्ते तथा जीवनविद्या मिशनचे राजाराम सावंत, शिवाय संघाचे अन्य पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. तालुक्यातील निराधार, दिव्यांग, आधार नसलेल्या ज्येष्ठांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. यावेळी उद्योजक विवेकानंद नाईक यांनी ५० हजार रुपये संघासाठी देणगी जाहीर केली. याशिवाय राजाराम सावंत २५ हजार रुपये, माधुरी सावंत २५ हजार रुपये, राघोबा सडेकर २० हजार रुपये आदींनी देणगी जाहीर केली आहे.