
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कुणबी समाज भवनाच्या कामासाठी समाजाने आमदार शेखर निकम यांच्याकडे मागणी केली होती. यावेळी समाज भवनासाठी आवश्यक सर्वोत्तोपरी मदत करणार हा शब्द आमदार शेखर निकम यांनी कुणबी समाजाला दिला होता. “बोले तैसा चाले” या प्रमाणे आमदार निकम यांनी या कुणबी भवनाच्या विस्तारिकरणासाठी 50 लाखांचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला. त्याबद्दल संगमेश्वर कुणबी समाजाच्यावतीने सावर्डे येथे आमदार शेखर निकम यांना भेटून त्यांचे आभार मानले.
आमदार शेखर निकम यांनी यावेळी कुणबी भवनाच्या कामकाजाविषयी माहिती घेतली. भवनाच्या बांधकामाविषयी आवश्यक सुचना दिल्या. कुणबी समाज भवनाचे विस्तारिकरण हे माझे कर्तव्य असल्याचे सांगितले. या भवनाच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रम यांना चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी संतोष थेराडे, राजेंद्र सुर्वे, नाना कांगणे, सुशिल भायजे, कृष्णा हरेकर, दत्ता ओकटे, विजय कुळेकर, निलेश भुवड, प्रविण भुवड, सहदेव सुवरे, संतोष भडवळकर, संतोष मुंढेकर, अप्पा फडकले, दिपक शिगवण, दत्ता लाखण, दत्ताराम लांबे, श्री. वीर, श्री. बोले आदी उपस्थित होते.