
सह्याद्रि शिक्षण संस्थेचे वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,असुर्डे आंबतखोल या विद्यालयाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद,रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या व
गुहागर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय जुदो स्पर्धेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले.विद्यालयाचे विद्यार्थी कुबेर सुनील पवार व अथर्व सचिन चव्हाण यांनी 19 वर्षे वयोगटात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला व त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.कुमार राहुल रामचंद्र भुवड 19 वर्ष आणि ऋत्विक विलास मोरे 14 वर्ष यांनी जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला.मुलींच्या स्पर्धेत आयुषा शिर्के,समिधा खापरे,सानिया शिगवण या 19 वर्षे वयोगटातील विद्यार्थिनींचा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आला व त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.तसेच साक्षी घावरे,सान्वी दरडे,प्राप्ती मळेकर यांनी 14 वर्ष वयोगटात जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला.या सर्व खेळाडूंना प्रसिद्ध ज्यूदोपटू व विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर भाट यांनी प्रशिक्षण दिले व मार्गदर्शन केले.
विदयार्थ्यांनी मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल सह्याद्रि शिक्षण संस्था,सावर्डेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार मा.शेखरजी निकम,सचिव मा.महेशजी महाडिक, जेष्ठ संचालक मा.शांताराम खानविलकर,शालेय समितीचे अध्यक्ष मा डी. ए.पाटील,सदस्य शंकर खापरे,यशवंत भागडे, रघुनाथ राऊत, पालक, ग्रामस्थ,क्रीडाप्रेमी यांनी यशस्वी विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक अमर भाट यांचे अभिनंदन केले व विभागस्तरावरील पुढील वाटचासलीस शुभेच्छा दिल्या.