
कणकवली : आगामी नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कणकवली नगरपंचायतीच्या प्रारुप प्रभाग रचना १८ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात आली आहे. यात एक सदस्यीय १७ प्रभाग आहे. याबाबत सूचना व हरकती सादर करण्याची गुरुवार २१ आॅगस्टपर्यंत मुदत होती. या प्रारुप प्रभाग रचनेबद्दल पाच हरकती दाखल झाल्या आहेत.
प्रारुप प्रभाग रचनेनुसार प्रभाग १ मध्ये एकूण ८३७ मतदार असून यात निमेवाडी, मधलीवाडी, करंबेळकरवाडी, सुतारवाडी, पिळणकरवाडी यांचा समावेश आहे. प्रभाग २ मध्ये ११०० लोकसंख्या असून यात वरचीवाडी, घाडीवाडी, धनगरवाडी, समर्थनगर या भागांचा समावेश आहे. प्रभाग ३ मध्ये ९६६ लोकसंख्या असून यात बांधकरवाडी, शिवशक्तीनगर व लगतचा परिसर यांचा समावेश आहे. लोकसंख्या प्रभाग ४ मध्ये १०९१ लोकसंख्या असून यात परबवाडी, शिवाजीनगर, शिवाजीनगर जळकेवाडीमधीललगतचा पश्चिम भाग यांचा समावेश आहे. प्रभाग ५ मध्ये ११७७ लोकसंख्या असून यात विद्यानगरच्या संपूर्ण भागाचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये ९१३ लोकसंख्या असून यात दक्षिण बाजारपेठ तर प्रभाग क्रमांक ७ मध्ये १०६६ एवढी लोकसंख्या असून बाजारपेठ रस्त्याची उत्तरेकडील भाग भालचंद्रनगर याचा यात समावेश आहे. प्रभाग ८ मध्ये १०२६ लोकसंख्या असून यात बौद्धवाडी व फौजदारवाडीचा समावेश आहे. प्रभाग ९ ची लोकसंख्या १०४३ एवढी असून यात टेंबवाडी रस्त्याच्या पूर्वेकडील भाग व कांबळीगल्ली यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक १० ची लोकसंख्या ११४५ असून यात हायवेच्या पूर्वेकडील टेंबवाडी भाग, गांगोवाडी यांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ११ ची लोकसंख्या १०२२ एवढी असून यात सोनगेवाडी, तेलीआळी येथील हायवेलगतचा भाग यांचा समावेश आहे. प्रभाग १२ ची लोकसंख्या ९७२ असून यात हर्णेआळी, तेलीआळी उर्वरित भाग यांचा समावेश आहे. प्रभाग १३ ची लोकसंख्या ८४० एवढी असून यात नेहरूनगर व बिजलीनगरचा समावेश होत आहे. प्रभाग १४ ची लोकसंख्या ७१४ असून यात जळकेवाड़ी उर्वरित दक्षिण भागाचा समावेश करण्यात आला आहे. प्रभाग १५ ची लोकसंख्या ८१४ एवढी असून यात नाथ पे नगर, शिवाजीनगर मधील रस्त्याच्या दक्षिणेकडील भागाचा समावेश आहे. प्रभाग १६ ची लोकसंख्या ७१० असून यात परबवाडीमधील उर्वरित भाग व शिवाजीनगरमथील दक्षिणेकडील भागाचा समावेश करण्यात आला आहे. प्रभाग १७ ची लोकसंख्या ९६२ असून यात कनकनगरचा समावेश करण्यात आला आहे.