विजयदुर्ग आगरासाठी नवीन 5 एसटी

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 25, 2025 20:33 PM
views 109  views

कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून विजयदुर्ग आगरासाठी नवीन पाच एसटी बस प्राप्त झाल्या आहेत. सोमवारी सकाळी श्री. राणे यांच्या वाढदिनाचे औचित्य साधत विजयदुर्ग आगारामध्ये केक कापून या नवीन बस गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. 

यावेळी भाजप पडेल मंडल अध्यक्ष महेश (बंड्या)नारकर , माजी सभापती रवी पाळेकर, युवा मोर्चा अध्यक्ष उत्तम बिर्जे, पडेल सरपंच भूषण पोकळे, विजयदुर्ग सरपंच रियाज काझी, महेश बिडये, प्रसाद देवधर, निलेश मणचेकर, महेश चव्हाण, ग्रेसिस फर्नांडिस, संजना आळवे, शुभा कदम, प्रतिक्षा मिठबाकर, पूर्वा लोंबर, गीता लळीत, विजयदुर्ग आगार व्यवस्थापक विवेक जमाले (आगार व्यवस्थापक, स्थानक प्रमुख सचिन डोंगरे, ए. डी. वारे, दर्शन डोंगरे, दीपक मिठबवाकर, अमित दत्ताराम डोंगरे, योगेश डोंगरे, सर्व विजयदुर्ग आगारातील सर्व कर्मचारी वर्ग, चालक वाहक, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.