अखेर कुडाळ एसटी आगारात नव्या ५ बसेस दाखल

आमदार निलेश राणे यांच्या मागणीला यश
Edited by:
Published on: June 10, 2025 12:18 PM
views 250  views

कुडाळ : एसटी महामंडळाकडून राज्यात नवीन बसेस देण्यात आल्या. सिंधुदुर्ग विभागातही आगारांना दोन महिन्यापूर्वी या बसेस दाखल झाल्या होत्या. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मुख्य आगार असलेल्या कुडाळमध्ये या नवीन बसेस नव्हत्या. मात्र, आज कुडाळ आगारात पुणे कार्यशाळेतून ५ नवीन बसेस दाखल झाल्या आहेत. आमदार निलेश राणे यांनी या एसटी बसेस कुडाळ आगाराला मिळाव्यात म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी केली होती. त्या मागणीला यश आले आहे.

अतिशय उत्कृष्ट बनावटीच्या आणि आरामदायी असलेल्या या बसेस कुडाळ आगारातून लांबपल्ल्याच्या फेऱ्यांसाठी वापरण्यात येतात.