
वेंगुर्ला: तालुक्यातील रेडी यशवंत गड आणि शिरोडा वेळागर या दोन्ही ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा कामासाठी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पातून प्रत्येकी ५ कोटी एवढा भरगोस निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे व भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला असून यासाठी जिल्हा परिषदचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
रेडी येथील यशवंत गड समुद्र किनारी तसेच शिरोडा वेळागर या दोन्ही ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा होणे खूप गरजेचे होते. पावसात समुद्राचे पाणी वाडी वस्तीत येत होते तसेच जमिनीची धूप होऊन माड बागायती चे बरेच नुकसान झाले होते. दरम्यान याठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा मंजूर झाल्याने हा प्रश्न सुटणार आहे. यासाठी मंजूर झालेल्या ५ कोटी पैकी सन २०२३- २४ करिता प्रत्येकी १.९० कोटी तरतूद करण्यात आली आहे. तसेच आपत्त्ती सौमीकरण अंतर्गत सुद्धा ही दोन्ही कामे प्रस्तावित आहेत.