
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेसाठी आज ५ अर्ज दाखल झालेत. निवडणूक कक्षामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे त्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केल.
संदिप राणे, आर्या सुभेदार, देवेंद्र टेमकर, नियाज शेख, नासिर शेख यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. माजी नगरसेवक शेख यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलीय. आज शिवसेनेकडून नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे उद्या अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेत.










