वैभववाडीत रक्तदान शिबीरात ४८ जणांनी केलं रक्तदान...!

दुर्गा माता सार्वजनिक उत्सव मंडळाचे आयोजन..!
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 24, 2023 10:00 AM
views 113  views

वैभववाडी : येथील  दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.मंडळाच्या कार्यकर्त्यांसह  तरुण रक्तदत्यांनी उत्स्फूर्तपणे  सहभाग नोंदविला.  जीवनधारा ब्लड बँक कोल्हापूर यांच्यावतीने रक्त संकलन करण्यात आले.

शहरातील दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळाला यावर्षी २५वर्षे पुर्ण झाली.यानिमित्ताने नवरात्र उत्सव भरगच्च कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे.खेळ पैठणी,पाककला, रक्तदान शिबीर,फुगडी स्पर्धा या सारखे अनेक कार्यक्रम व उपक्रम मंडळाच्यावतीने यावर्षी घेण्यात आले.तसेच मंडळातील जेष्ठ मंडळींचा सन्मान करण्यात आला.सांस्कृतीक कार्यक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम मंडळाच्यावतीने राबविण्यात येत आहेत.रविवारी देवीच्या मंडपात रक्तदान शिबीर आयोजित केले.यामध्ये ४८रक्तदात्यांनी रक्तदान केले.या सर्व रक्तदात्याना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मंडळाच्यावतीने सन्मानित करण्यात आले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र पाताडे, माजी अध्यक्ष शांताराम रावराणे, सज्जन रावराणे, रोटरी क्लब चे अध्यक्ष संजय रावराणे, सचिव प्रशांत गुळेकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान चे वैभववाडी अध्यक्ष राजेश पडवळ, सदस्य प्रशांत ढवण, रविंद्र तांबे, संतोष रावराणे व जीवनधारा ब्लड बँक कोल्हापूरचे कर्मचारी उपस्थित होते.